Monday, November 5, 2018

Happy Diwali in Electrical Style

*voltage* पेक्षा जास्त तुमच्या आयुष्याची *Efficiency* असावी..
*current* सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो..
*circuit breaker* सारखी तुम्हाला सुरक्षा मिळो..
तुमच्या प्रगतीला *exhaust* चे पंख मिळो..
*energy meter* पेक्षा जास्त तुमच्या विकासाला गति येवो..
*wattmeter* चे सामर्थ्य तुम्हाला लाभो..
*frequency meter* पेक्षा चांगली तुमची आकलन शक्ति होवो..
तुमच्या आयुष्याला कधीच *short circuit* सारखे *fault* लागू नये..
तुमच्या आयुष्यातील सर्व सुख दुःख *electrically* आणि *Dynamically Balance* होवो..
*cooler* पेक्षा थंड झोप तुम्हाला रोज लागो..
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला *induction motor* ची *Power* मिळो..
तुमच्या कामाची *power efficiency* पेक्षा पण जास्त होवो..
*DC machine* मशीन ऑपरेशन पेक्षा जास्त *Smooth* तुमचं आयुष्य जावो..
*ele. Fitting* पेक्षा मोठा आनंद तुमच्या आयुष्यात  येवो..
तुमच्या प्रत्येक *PROBLEM* ला लवकरच *Flexible Solution*  मिळो..
तुमच्या चेहऱ्यावर *DIAMOND* पेक्षा जास्त चमक येवो..
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख *1 phase* ने कमी होवो आणि प्रत्येक आनंद *3 phase* ने वाढत जावो!!

*तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला दीपावलीच्या  अभियांत्रिकीपूर्ण शुभेच्छा !!*

🏮💐 *Happy DIWALI* 💐🏮

Happy Diwali in Mechanical style

carnot cycle पेक्षा जास्त तुमच्या आयुष्याची efficiency असावी ,
Piston cylinder सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो ,
ABS सारखी तुम्हाला सुरक्षा मिळो ,
तुमच्या प्रगतीला HONDA चे पंख मिळो ,
BUGATI  VERYON पेक्षा जास्त तुमच्या विकासाला गति येवो ,
MILD STEEL चे सामर्थ्य तुम्हाला लाभो ,
ANSYS पेक्षा चांगली तुमची आकलन शक्ति होवो ,
तुमच्या आयुष्याला कधीच DISC सारख BRAKE लागू नये , तुमच्या आयुष्यातील सर्वसुख  दुःख STATICALLY आणि DYNAMICALY BALANCE होवो ,
5 STAR REFRIGERATOR पेक्षा थंड झोप तुम्हाला रोज लागो ,
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला RAM JET ENGINE ची POWER मिळो ,
तुमच्या कामाची ACCURACY CMM पेक्षा पण जास्त होवो ,
CNC मशीन ऑपरेशन पेक्षा जास्त SMOOTH तुमचं आयुष्य जावो ,
TITANIC पेक्षामोठा  आनंद तुमच्या आयुष्यात  येवो ,
तुमच्या प्रत्येक PROBLEM ला लवकरच FEASIBLE SOLUTION मिळो ,
तुमच्या चेहऱ्यावर DIAMOND पेक्षा जास्त चमक येवो ,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख SUBTRACTIVE MANUFACTURING ने कमी होवो आणि प्रत्येक आनंद ADDITIVE MANUFACTURING ने वाढत जावो !
तुम्हाला दीपावलीच्या यांञीकी अभियांत्रिकी पूर्ण शुभेच्छा !
#Happy_Diwali
# *Royal_Mechanical*😎✌🏻🤘🏻💪🏻

Friday, October 26, 2018

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे. .


‘एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. माझ्या जवळच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या. अचानक एक झुरळ उडत उडत येऊन एका महिलेच्या अंगावर बसले. ते झुरळ बघून ती महिला घाबरून किंचाळायला व थयथयाट करायला लागली. तिचा हा थयथयाट मिनीटभर तरी चालू होता. मोठ्या मुष्किलीने तिने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्याच ग्रुपमधल्या दुसर्याल महिलेच्या अंगावर जाऊन बसले. मग त्या महिलेने पण किंचाळायला व थयथयाट करायला सुरवात केली. तेवढ्यात त्या हॉटेलचा वेटर तेथे आला. त्या दुसर्याथ महेलेने पण मोठ्या मुष्किलीने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्या वेटरच्या अंगावर जाऊन बसले. मला वाटले की आता वेटर पण थयथयाट करणार. पण तसे काही झाले नाही. ते झुरळ अंगावर पडताच तो वेटर स्तब्ध उभा राहीला. अजिबात हालचाल न करता त्या झुरळाच्या मुव्हमेन्ट्स बघत राहीला. योग्य वेळ येताच त्याने ते झुरळ झटक्यात पकडले आणि हॉटेबाहेर फेकून दिले. मी विचार करू लागलो की जी गोष्ट त्या वेटरला जमली ती गोष्ट त्या दोन महिलांना का जमली नाही?
.
माझ्या लक्षात आले की त्या दोन महिला घाबरून ‘रिऍक्ट’ (React) होत होत्या तर त्या वेटरने ‘रिस्पॉन्ड’ (Respond) दिला होता.
.
त्या दोन महिला झुरळाला घाबरून ‘रिऍक्ट’ होत नव्हत्या तर आपण झुरळाच्या समस्येला तोंड देऊ शकत नाही या विचाराने भितीने गर्भगळीत होऊन ‘रिऍक्ट’ होत होत्या.
.
पण वेटरचे तसे नव्हते. आपण झुरळाच्या या समस्येला तोंड देऊ शकतो याची त्याला खात्री असल्यामूळे त्याने ‘रिस्पॉन्ड’ देण्याचे ठरवले होते.’
.
तात्पर्य
.
पहिली गोष्ट म्हणजे ‘रिऍक्ट’ (React) आणि ‘रिस्पॉन्ड’ (Respond) या शब्दांमधला फरक लक्षात घ्या.
.
आयुष्यात कोणतीही समस्या आली की ‘आपण ही समस्या सोडवू शकत नाही’ या भितीपोटी माणूस ‘रिऍक्ट’ होत असतो. कुठलीही समस्या आली की तिला ‘रिऍक्ट’ होणे हा जरी मनुष्यस्वभाव असला तरी त्यामध्ये आपली कमजोरी दिसत असते. कारण मनुष्य जेव्हा ‘रिऍक्ट’ होतो तेव्हा तो बहुतेकपणे चुकिच्या माहितीमूळे, चुकीच्या विचारांमूळे, चुकीच्या गायडन्स मूळे, आत्मविश्वास नसल्यामूळे किंवा चुकिच्या संगतीने ‘रिऍक्ट’ होत असतो.
.
पण आपण या समस्येला तोंड देऊ शकतो अशी जेव्हा माणसाची भावना होते तेव्हा तो त्या समस्येला ‘रिस्पॉन्ड’ द्यायच्या, म्हणजेच तोंड द्यायच्या प्रयत्नांना सुरवात करतो. मग तो यासाठी योग्य ती माहिती गोळा करतो, योग्य व्यक्तिंचा सल्ला घेतो, योग्य विचार मनात आंणतो, मन शांत आणि खंबीर ठेवतो. शांत चित्ताने पण दृढ निश्चयाने त्या संकटाचा मुकाबला करू लागतो.
आयुष्यात अनेक समस्या येत असतात. अनेक झुरळे अंगावर बसत असतात. या समस्यारूपी झुरळांना ‘रिऍक्ट’ होऊन थयथयाट करत बसायचे का ‘रिस्पॉन्ड’ देऊन त्यांना हाकलून द्यायचे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?

Thursday, September 20, 2018

Online Computer Training

Pick up a new skill like Android App Development, Web Development, Programming with Python,JAVA,C,C++, Digital Marketing, AutoCAD so on in this Winter which will help you in your career. Internshala is offering Online Winter Training in 10+ certified industry skills. Use code ISP11418SAC to avail 55% + 10% discount discount on all training programs until 30th September. Visit: https://trainings.internshala.com/?referral=ISP11418SAC&utm_source=ISP11&utm_medium=ISP11418SAC&utm_campaign=ISP11_WAPPT

Thursday, September 6, 2018

गावचा संरपच व ग्रामसेवक यांची झोप उडुन देणारी बातमी

गावचा संरपच व ग्रामसेवक यांची झोप उडुन देणारी बातमी

तुमच्या गावच्या सरपंचांनी किती कामे केलेली आहेत व त्यासाठी किती निधी शासनाकडून मिळाला आहे ते आपण आता खालील वेबसाईटवर पाहू शकता...
जर मिळालेल्या निधी प्रमाणे सरपंचांनी काम केले नाही तर तुम्ही त्यांना त्याबद्दल नक्की विचारा...हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे

http://www.planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getDevPlanStatus

#योग्य सरपंच निवडला तर १००% गावचा विकास

Sunday, August 12, 2018

उद्योगपती असेच होता येत नाही

उद्योगपती असेच होता येत नाही*
माणुस पण असाच मोठा होत नसतो. 10 रु. नोकरी ते 10 हजार कोटीं ची उलाढाल.
फिनोलेक्स चे संस्थापक प्रल्हाद परशराम छाब्रिया ऊर्फ PP यांचा थक्क करुण देणारा हा प्रवास. 35 वर्षा पूर्वी कोणाला स्वप्नात पण वाटल नसेल की हा मुलगा 1 दिवस उद्योग क्षेत्रा मधे आपले वर्चस्व निर्माण करुण फाइबर इंडस्ट्री वर राज्य करेल पण हे शक्य झाल मेहनत चिकाटी आणी प्रयत्नवादा मुळे
PP हे मुळ चे पाकिस्तान च्या सिंध प्रांतात ले त्यांचे वडिल परशराम छाब्रिया हे तिथील प्रसिद्ध कापड व्यापारी पण 1942 साली वडिलांच आकस्मित निधन झाल आई 5 बहिणी व 5 भाऊ अस हे कुटुंब उघड्या वर आल. त्या वेळी प्रल्हाद छाब्रिया एका दूरच्या नातेवाईकाचा धागा पकडून पुण्यात आले. त्यावेळी त्यांच वय होत अवघ 12 वर्ष व शिक्षण 2री झालेल शिक्षाण नसल्य मुळे कोणी नोकरी देत नव्हत. शेवटी एका ठिकाणी त्याना सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली 16 ते 18 तास काम करू लागले दर महिना ते आपल्या आईला 30 रु पाठवत होते त्यातच1945 साली फाळणी च्या झळा बसु लागल्या तय मुळे सर्व छाब्रिया कुटुंब पुण्या मधे आले. नारायण पेठेत 2 रूम मिळाल्या. त्यानंतर छाब्रिया बंधुनी मुंबई हुन कापड आणुन कापड विक्रिचा व्यवसाय चालु केला त्या मधे पण कसे तरी 5रू मिळायचे. त्या नंतर इलेक्ट्रोनिक्स च्या वस्तु विकु लागले सरकारी निविदा भरणे चालूच होत. परिस्थिति पण खुप बिकटच होती कधी जेवन मिळत होत तर कधी पाणी पिउन भुक मिटवावी लागत होती.
प्रयत्न मात्र चालुच होते. त्यातच देहु कँटोमेंट बोर्डा ची बेडिंग वायर ची निविदा निघाली आणी तोच छाब्रियां साठी टर्निंग पॉइंट ठरला हे काम छाब्रियां ना मिळाल व 10 बाय 10 च्या खोलीतून फिनोलेक्स चा प्रवास सुरु झाला तो आज पर्यन्त कधी थांबला च नाही एका छोट्याश्या खोलीतुन सुरु झालेली ह्या कंपनीचे आज सगळ्या भारतभर जाळे पसरले आहे. पुणे, रत्नागिरी , शिरवळ, गोवा, उत्तराखंड अश्या 5 कंपनी व 11 कारखाने असा हा फिनोलेक्सचा पसारा वाढला आहे. २ री नंतर शाळेत ही न जाऊ शकणारे छाब्रिया हे उद्योगपति झाले फ़क्त आणी फ़क्त कष्ट आणी प्रत्नांवरती. हार कधी या माणसाने मानलीच नाही असंख्य संकटे आली पण कधी मागे सरकला नाही तेही पाठिशी कोणीसुद्धा नसताना.आजच्या काळा मधे आमचा इंजीनियर इतक्या लवकर हारला की तो आज स्वताची इज्जत स्वताच सोशल मीडया वर काढत आहे . हे दुर्दैवच म्हणावं लागेल. उत्तुंग शिखरावर चढत असतानासुद्धा छाब्रिया कुटुंबाचे पाय हे सदैव जमीनीवरतिच राहिले. सगळा उद्योग व्यवस्थित चालु झाला होता कश्याचिच कमतरता नहव्ती तरीसुद्धा छाब्रीयांच्या 5 ही जनांची मुल सकाळी लवकर कंपनी मधे येउन कचरा काढण्या पासुन ते केबल तयार करण्या पर्यन्तचे काम न लाजता स्वता इतर कामगार लोकांबरोबर करायची. 12 ला कंपनी च्याच कैंटीन मधे जेवण करुण ही पिंपरी मधुन लोकलने पुण्याला वाडिया कॉलेज ला शिक्षणासाठी जायची कॉलेज सुटलं की परत कंपनी मधे कामाला यायची स्वतःचे वडिल उद्योगपती असताना ही मुलं कधीच कामाला लाजली नाहीत म्हणून आज यशापर्यन्त पोहचलेत
*आमच्या आजच्या मुलाना वडिलांनी काम सांगण्या आधीच आई म्हणते तो - ती इंजीनियरिंगला आहे, MBA ला आहे - याला आहे-त्याला आहे - त्याला/तीला हे काम नका सांगू.*
जीवनात कोणतच काम हे कमी नसतं आणि कामापेक्षा कोणी मोठं नसत हे श्री प्रल्हाद छाब्रिया यांनी सिद्ध करुण दाखवल.
अश्या या तडफदार व खंबीर उद्योगपतीला प्रथम पुण्यस्मरणाच्या निम्मितान
*" फिनोलेक्स"*

Thursday, June 28, 2018

चूक

*शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले.*
9×1 =9
9×2 =18
9×3 =27
9×4 =36
9×5 =45
9×6 =54
9×7 =63
9×8 =72
9×9 =81
9×10=89

*लिहल्यानंतर सरांनी मुलांकड़े पाहिलं, तर मूलं त्यांच्यावर हसत होती कारण शेवटची एक लाइन चुकली होती.*

*स्मितहास्य करत सरांनी मुलांकडे पाहिले आणि म्हणाले की, मी शेवटची लाईन मुद्दाम चूकीची लिहली आहे कारण तुम्हा सर्वांना खुप महत्वपूर्ण अशी शिकवण देऊ शकेन.*

*समाज तुमच्याशी असाच व्यवहार करेल.*

*तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्ष्यात येईल कि, बोर्ड वर मी नऊ वेळा बरोबर लिहलं आहे तरीसुद्धा माझ कोणीच कौतुक केले नाही.*

*माझ्या फक्त एका चुकीवर आपण सर्वजन हसलात आणि मला समजून घेतले नाही.*

*तात्पर्य*
*तुम्ही लाख चांगली कार्य केली तरी समाज कधी ही तुमच्या चांगल्या कार्याच कौतुक करणार नाही. पण तुमची एक जरी चुक झाली तर ते तुमच्यावर असच हसतील आणि ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाही.*
👉कटू आहे पण सत्य आहे👈

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, June 21, 2018

महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा प्रवेश मेरिट लिस्ट - XI Science, Commerce,Bcom, BSC

महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील नवीन प्रवेश 2018-19 11वी(विज्ञान), 11 वी (कॉमर्स), BCOM, BSC ची पहिली मेरिट लिस्ट लागली आहे.

मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी http://mmnilanga.org/downloadreg

Tuesday, June 5, 2018

शाळेची पुस्तके ईबुक

पालकांसाठी आणि मुलांसाठी,                                                                 अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx                                              या वेबसाईटवर जा.                                                                                  तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा                                                       (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu)                                                                                                 आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या. आणखी एक करा, शक्य तितक्या पालकांपर्यंत हा निरोप पोहोचवा.

Tuesday, January 23, 2018

जगातील प्रसिद्ध बिझनेसमन्स


बिल गेट्स – जगातील प्रसिद्ध बिझनेसमन्सपैकी एक आहेत बिल गेट्स. त्यांनी पर्सनल कम्प्युटरचा शोध लावला. ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे निर्माण ही त्यांनी केले. आज आपल्या ऑफिस आणि घरी असलेले कम्प्युटर आणि लॅपटॉपची गरज यांनीच निर्माण केली. आज बिल गेट्सच्या संपत्तीचे मूल्यांकन 86.7 बिलीयन डॉलर इतके आहे.

 

मार्क झकरबर्ग – ‘फेसबुक’चा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गने लोकांना फेसबुकचे वेड लावले. जगातील अनेकांचे बिझनेस आज फेसबुकला मार्केटिंग टूल म्हणून वापरतात. म्हणूनच मार्कच्या संपत्तीचे मूल्यांकन 59.5 बिलीयन डॉलर इतके आहे.

सचिन आणि बिन्नी बंसल –आयआयटी दिल्ली येथून पदवीधर झालेले हे दोघा भावांनी आपला जॉब सोडून ‘फ्लिपकार्ट’ ही कंपनी सुरू केली. लोकांना घर बसल्या शॉपिंग करण्याची सवय यांनी लावली. या दोघांच्या संपत्तीचे मुल्यंकन 650-750 मिलीयन डॉलर एवढे आहे.

 

बर्नार्ड अर्नॉल्ट – नामी उद्योजक बर्नार्ड अर्नॉल्ट हे ‘एलव्हीएमएच’चे सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीकडे ‘लुई व्हायटन’, ‘बुलगारी’ आणि ‘टॅग ह्युअर’ असे काही लक्झरी उत्पादन आहेत. त्यांनी श्रीमंत नागरिकांसाठी अनेक प्रोडक्ट्स तयार केली. त्यांच्या संपत्तीचे मूल्यांकन 45.5 बिलीयन डॉलर इतके आहे.

गुगल हे सर्च इंजिन बनवणारे सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज – आपण इंटरनेट सुरू केल्यावर येणारे गुगल हे सर्च इंजिन या दोघांनी बनवले आहे. त्यांनी जगभरातील इंटरनेट युझर्सला गुगल वापरण्यास भाग पाडले. या दोघांच्या संपत्तीचे एकूण मुल्यांकन 80 बिलीयन डॉलरहून अधिक आहे.

 

जेफ बेझॉझ – जगातील सर्वात मोठी ‘अमेझॉन’ या ई-कॉमर्स वेबसाईटचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझॉझ आहेत. त्यांनी वेबसाईटद्वारे पुस्तके त्यानंतर सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू विकण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरू केले. आज जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. संपत्तीचे एकूण मुल्यांकन 75.2 बिलीयन अमेरिकन डॉलरहून अधिक आहे.

Saturday, January 6, 2018

घरबसल्या करा हे काम ; मोदी सरकार देणार १ लाखाचे बक्षीस


२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन जवळ येऊन ठेपला आहे.

नवी दिल्ली : २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन जवळ येऊन ठेपला आहे. तो साजरा करण्यासाठी मोदी सरकारने खास स्पर्धांचे आयोजन केले आहे.

काय आहे स्पर्धा?

या स्पर्धेतील विजेत्याला लाख रूपये बक्षीस मिळणार आहे. हे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला घरबसल्या फक्त ५ मिनीटं खर्च करायचे आहेत. या स्पर्धेत तुम्ही देखील भाग घेऊ शकता. या स्पर्धेतील विजेत्याला १ लाख तर दूसऱ्या विजेत्याला ७५ हजार आणि तिसऱ्या विजेत्याला ५० हजार रूपयांचे बक्षीस मिळणार आहे.

याशिवाय सरकारकडून दोघांना सांत्वना पुरस्कार देण्यात येईल. त्यात प्रत्येक स्पर्धकाला १५-१५ हजार रूपयांचे बक्षीस मिळेल. यात वयाची कोणतीही अट नसली तरी या स्पर्धेचे आयोजन दोन विभागात करण्यात आले आहे. १८ आणि पुढील वयोगटाचा पहिला गट आणि दुसऱ्या गटात १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतात. दोन्ही विभागात वेगवेगळी बक्षीसे दिली जातील. या स्पर्धेत तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते सोडवण्यासाठी तुम्हाला ५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.

जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी

मोदी सरकारने देशातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी मायगोव डॉट इन (http://mygov.in)आणि मायगोव मोबाईल अॅप सुरू केले आहे. या पोर्टलवर किंवा अॅपवर अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. 

आता या बेवसाईटवर नवीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सरकारने सांगितले की, राष्ट्राची सेवा आणि सुरक्षिततेसाठी वीरता पुरस्कार म्हणजेच परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ति चक्र आणि शौर्य चक्र दिले जाते. या पुरस्कारांबद्दल आणि हे पुरस्कार मिळालेल्या सैनिकांबद्दल प्रश्न विचारण्यात येतील. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ५ मिनीटाच्या आत द्यायची आहेत.

असा घ्या भाग

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास quiz.mygov.in वर लॉगइन करा. त्यानंतर समोर  क्विज सुरू होईल. यात तुम्हाला १५ प्रश्न विचारण्यात येतील. यांची उत्तरे ५ मिनिटात तुम्हाला द्यायची आहेत.

ही आहेत बक्षीसे 

पहिला पुरस्कार : १ लाख रुपये
दूसरा पुरस्‍कार : ७५ हजार रुपये
तीसरा पुरस्‍कार : ५० हजार रुपये
सांत्‍वना पुरस्‍कार (दो) : १५ हजार रुपये

भाग घेण्याचा कालावधी

ही स्पर्धा १ जानेवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरू झाली आहे. यात भाग घेण्यासाठी १० जानेवारी रात्री ११-५९ मिनिटापर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे.

या मिळणार सोयी

या स्पर्धेतील विजेत्याला २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात आणि २८ जानेवारीला बिटिंग रिट्रीटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जर तुम्ही दिल्लीच्या बाहेर राहत असाल तर दिल्लीत पाच दिवस राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय मिनिस्‍ट्री ऑफ डिफेंसतर्फे करण्यात येईल. प्रवासासाठी तुम्हाला थर्ड एसीचे रेल्वे तिकीट देण्यात येईल. १८ वर्षाखालील मुलासोबत येणाऱ्या एकाची सोय करण्यात येईल. 

Monday, January 1, 2018

Happy New Year 2018

नवीन वर्ष 2018 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!