बिल गेट्स – जगातील प्रसिद्ध बिझनेसमन्सपैकी एक आहेत बिल गेट्स. त्यांनी पर्सनल कम्प्युटरचा शोध लावला. ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे निर्माण ही त्यांनी केले. आज आपल्या ऑफिस आणि घरी असलेले कम्प्युटर आणि लॅपटॉपची गरज यांनीच निर्माण केली. आज बिल गेट्सच्या संपत्तीचे मूल्यांकन 86.7 बिलीयन डॉलर इतके आहे.
मार्क झकरबर्ग – ‘फेसबुक’चा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गने लोकांना फेसबुकचे वेड लावले. जगातील अनेकांचे बिझनेस आज फेसबुकला मार्केटिंग टूल म्हणून वापरतात. म्हणूनच मार्कच्या संपत्तीचे मूल्यांकन 59.5 बिलीयन डॉलर इतके आहे.
सचिन आणि बिन्नी बंसल –आयआयटी दिल्ली येथून पदवीधर झालेले हे दोघा भावांनी आपला जॉब सोडून ‘फ्लिपकार्ट’ ही कंपनी सुरू केली. लोकांना घर बसल्या शॉपिंग करण्याची सवय यांनी लावली. या दोघांच्या संपत्तीचे मुल्यंकन 650-750 मिलीयन डॉलर एवढे आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट – नामी उद्योजक बर्नार्ड अर्नॉल्ट हे ‘एलव्हीएमएच’चे सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीकडे ‘लुई व्हायटन’, ‘बुलगारी’ आणि ‘टॅग ह्युअर’ असे काही लक्झरी उत्पादन आहेत. त्यांनी श्रीमंत नागरिकांसाठी अनेक प्रोडक्ट्स तयार केली. त्यांच्या संपत्तीचे मूल्यांकन 45.5 बिलीयन डॉलर इतके आहे.
गुगल हे सर्च इंजिन बनवणारे सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज – आपण इंटरनेट सुरू केल्यावर येणारे गुगल हे सर्च इंजिन या दोघांनी बनवले आहे. त्यांनी जगभरातील इंटरनेट युझर्सला गुगल वापरण्यास भाग पाडले. या दोघांच्या संपत्तीचे एकूण मुल्यांकन 80 बिलीयन डॉलरहून अधिक आहे.
जेफ बेझॉझ – जगातील सर्वात मोठी ‘अमेझॉन’ या ई-कॉमर्स वेबसाईटचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझॉझ आहेत. त्यांनी वेबसाईटद्वारे पुस्तके त्यानंतर सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू विकण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरू केले. आज जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. संपत्तीचे एकूण मुल्यांकन 75.2 बिलीयन अमेरिकन डॉलरहून अधिक आहे.