कोतापुरे इन्फोटेक मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा
एम.के.सी.एल. तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगणित, भूमिती, शास्त्र आणि इतिहास या विषयांकरीता कंप्यूटरवरसराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नसंच आणि उत्तरे इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी पध्दतीमध्ये उपलब्ध आहेत. एम.एस.सी.आय.टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्र कोतापुरे इन्फोटेक मध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यासाठी मोफत आहे.
*एम.के.सी.एल.च्या ईरा या सॉफ्टवेअर प्रणालीतून* ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली असून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. केदार टाकळकर यांनी *बोर्डाच्या आभ्यासक्रमावर आधारीत* ऑबजेक्टीव्ह प्रश्नोत्तरे या सराव परीक्षांकरीता तयार केली आहेत. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी यानिमित्ताने करता येईल. या परीक्षेस येणा-या विद्यार्थ्याला अभ्यासाचे प्लॅनिंग कसे करावे?परीक्षेदरम्यान आहार काय असावा ?याचेही मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळांनी करावा असे आवाहन एम.के.सी.एल. तर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी संपर्क
कोतापुरे इन्फोटेक,मदनसुरी 9850490173
(महेश कोतापुरे)
कोतापुरे इन्फोटेक,मदनसुरी 9850490173
(महेश कोतापुरे)
No comments:
Post a Comment
Thanks