Wednesday, December 25, 2019

इंजिनियर ची कदर


 अलबट फर्नांडिस त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे ...

रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळे कोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं, "इंजिनियर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही."

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आंत न्यायाधीश म्हणालेत,
अॕन इंजिनियर  इज इन द कोर्ट ...!

आणि सगळे लोक उठून उभे राहिलेत आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंड रद्द केला गेला.

त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.

ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?

अमेरिकेत  केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविश्ष्ट मानलं गेलं आहे. वैज्ञानिक आणि इंजिनियर.

फ्रान्सच्या न्यायालयां मधे केवळ *इंजिनियरना* खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.

जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या इंजिनियरला अटक करू शकतात.

कोरियात प्रत्येक इंजिनियरला ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात, केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.

अमेरिकन आणि  युरोपीय देशांमध्ये  इंजिनियरला सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच निवारा देतात.

ज्या समाजात इंजिनियरचा अपमान होतो, तिथं फक्त चोर, आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.

सर्व इंजिनियर्संना  समर्पित...

No comments:

Post a Comment

Thanks