MH🏡
🎂20Nov🎉
👨🎓eR estdT📚👼🎊
☺crazY 🎅🌐🎭fuNmasti🏄
🎭IT🎵🎤tayloRswifT🎶Stve🌟Gtes🎮
jmeS📟zucK💉torvaldS🎯🎊🏪lonG driveS 🚘
Saturday, April 22, 2017
Intro
" म्हातारी "
" म्हातारी "
बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.
"ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही." म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.
"का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?"म्हातारी बोलली.
" तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ......कशाचं आहे ते गठुळं ?"
" वांगी हाईत."
"मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही."
"एवढं कुठं जास्त आहे ? ......तर नुसती एक बुट्टी तर आहे." म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.
" म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?" कंडक्टरनं विचारलं.
"मार्केट दे बाबा एक."
"लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल."
"ते काय असतंय ?"
"हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल."
"एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?...का उगाचच छळायचं गरीबाला ?"
"तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल."
"काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा."
इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .
"कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन."
कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली.
"आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ....का ट्रंकंला लगेज नसतंय ?" म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. "घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं." म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली.
ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ," ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे."असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.
तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली.
"आज्जी , वांगी कशी दिली ?" तिनं विचारलं.
" दहा रुपये पावशेर."
"पाच रुपयानं देणार ?"
"एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?"
"मग राहू दे." ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.
नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं.
"मावशे , वांगी कशी ?" एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं."
"वीस रूपये अर्धा किलो." म्हातारी बोलली.
"एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !"
"गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?"
"होय ! कालच आणली."
"किती रूपयला ?"
"पंचावन्न हजारला."
" मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?" तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.
म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.
तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.
अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.
"कशी काय पडली ?"
"उन्हाचा तडाखा बसला असेल."
"सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल."
"कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल."
सतरा जणांची सतरा तोंडं !
कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.
घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.
"म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?" कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.
"चल , मग काय तरी खाऊन घे...नाहीतर कोम्यात जाशील."
दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.
" आज्जी , वर बसा की !"वेटर बोलला.
"असूदे हितंच ."
"काय खाणार ?"
"काय हाय ?"
" बैंगन मसाला आणि रोटी देवू ?"
"ते काय असतंय ?"
"वांग्याची भाजी आणि रोटी !"
"चालंल." म्हातारी बोलली.
"तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची ." बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.
म्हातारीचं जेवण झालं.
"आज्जी , भात देऊ ?" वेटरनं विचारलं.
"नको.....पैसं किती झालं ?"
"एकशे ऐंशी रूपये."
"किती ?"
"एकशे ऐंशी रूपये.....साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी."
"एवढं पैसं एका जेवणाला ?"
यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी.... दोनशे वीस रुपये झाले.
म्हातारी हिशेब लावत होती...
चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये....? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये....?
मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..?
विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली..... कोसळली ती कायमचीच.....!
माफ करा शेतिविषयक नाही....
पण चिंतन करायला लावणारी आहे.....
रहावल नाही म्हणुन पाठवलं ..... वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा...व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा...
Friday, March 31, 2017
‘महा आय. टी. जिनियस’ स्पर्धा 2017
Tuesday, March 28, 2017
Monday, March 27, 2017
Thursday, March 16, 2017
MS-CIT च का ?
जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकरसर व डॉ. विवेक सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.
MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे .....
( महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE )
MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो.
MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही या अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे.
अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.
शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
MS-CIT अनिवार्य आहे. डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.
MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 7 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त *MS-CIT* मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे साॅफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS..... बॅटरी Backup ची सोय
MS-CIT ची परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या MSBTE या बोर्डाकडून घेतली जाते.
MS-CIT केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.
MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.
MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह)
MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सटीफिकेट
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती. ICT केल्यानंतर पुढे काय तर ते म्हणजे MS-CIT
या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संगणक संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा.....
- सचिन विजयकुमार कोतापुरे
(ALC Coordinator)
कोतापुरे इन्फोटेक,मदनसुरी
मो.नं -9850490173 , 9112000292
ईमेल - 45210303@mkcl.org
Saturday, March 4, 2017
"जागतिक महिला दिनानिमित्त" महिला व मुलींसाठी विनामूल्य कंप्यूटर कार्यशाळा
⌨
महेश कोतापुरे 9850490173,
सचिन कोतापुरे9422300893



