Wednesday, June 28, 2017

स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from steve jobs in marathi )

स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from steve jobs in marathi )

स्टिव्ह जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःलाे वाहून घेतले होते. आयफोन, ‘आयपॉड’, ‘आयपॅड’ हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. आज आपण स्टिव्ह जॉब्स याचे काही सिक्रेट नियम पाहणार आहोत. जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडला. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे नियम खूप कामी येतील.

1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.(Do what you love to do.)

स्टिव्ह जॉब्स म्हणतो

“Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do.”

मित्रांनो तुम्ही आज कुठले ही क्षेत्र घ्या, वरवर पाहता ते खूप सोप्पे वाटते. पण जसे जसे तुम्ही त्यात डीप मध्ये जाता तेंव्हा तुम्हाला कळते की त्या कामात खूप अडचणी आहेत. त्यात देखील खूप कौशल्य लागतात.अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कामाचा प्रती उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ना तोंड देऊच शकणार नाही.

म्हणूनच अडचणी च्या वेळी तुमचं त्या कामाच्या प्रति किती आवड आहे हेच ठरवते की तुम्ही त्या क्षेत्रात रहाणार कि नाही. थोडक्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल. तर तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.

2)वेगळे विचार करा (think different)

स्टिव्ह म्हणतो

Better Be a pirate than to join navy. Be different

बराच वेळा आपण ते करतो जे सर्व लोक करत आहेत. आपण मळलेल्या वाटांवरच चालणे जास्ती पसंद करतो. कारण नव्या वेगळ्या वाट शोधणे आणि त्या वर चालणे आपल्याला असुरक्षित वाटते किंवा आपण भितो नवीण वाटेवर चालायला.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर ते मिळवायचे असेल जे कोणी आज पर्यंत मिळवले नसेल तर तुम्हाला हि ते करावं लागेल जे आज पर्यंत कोणी कधी केली नसेल. ईतर लोकांनी जे केलं, जी वाट शोधली त्याच वाटेवर तुम्ही गेलात तर तुम्ही देखील तिकडेच जाल जिकडे ते गेले. त्यात नाविन्य ते काय. म्हणून

Be Different, think different.

स्टिव्ह जॉब्स कॉम्प्युटर बनवायचा, मोबाईल इत्यादी अनेक गोष्टी तो हयातीत असताना अप्पल ने बनवले. या सर्व गोष्टी काय नवीन होत्या? अजिबात नाही, पण आपण बघतो अप्पल आणि बाकी कंपनीन मधील फरक. येथे वेगळा विचार म्हणजे नाविनच काही तरी केले पाहिजे असा होत नाही तर सगळे जे करतात त्याचा पेक्षा आपण वेगळे करायला पाहिजे. लक्षात ठेवा “विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.”

3) पहिले पाऊल टाका (first step is hardest one, just take it)

एक व्यक्ती ने त्याचा देशाचे संपूर्ण भ्रमण केले होते ते देखील सायकल चालवत. या त्याचा पराक्रमा नंतर पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखती मध्ये त्यांनी त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला या प्रवासात सर्वात जास्ती कोणती गोष्ट अवघड वाटली. त्या वर त्या व्यक्तीचे उत्तर होते की घरचा उंबरटा ओलांडणे सर्वात आवघड वाटले. एखाद्या कामाची सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते.

या वर स्टिव्ह म्हणतो.
Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition.

पहिले पाऊल टाकणे हेच कधी कधी सर्वात अवघड काम बनते, तेव्हा ते पाऊल टाका आणि अंतर्मनचे ऐका, ध्येर्य बाळगा. जेंव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेंव्हा तुम्हांला दुसरे पाऊल कुठे टाकायचे हे तुम्हांला लक्षात येईल.

4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा (start small, think big)

स्टिव्ह जॉब्स आणि त्याचा मित्र स्टिव्ह वॉझनिएक या दोघांनी अप्पल कंपनी ची स्थापना एका ग्यारेज मध्ये केली होती. त्यां दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर ‘अप्पल-1’ बनवण्या साठी 1000 डॉलर्स ची गरज होती ती त्या दोघांनी त्यांचा आवडत्या गोष्टी विकून मिळवल्या होत्या. आज तुम्हाला सांगायची गरज नाही की अप्पल कंपनी कुठे बाकी कंपनी च्या तुलनेत.

म्हणून स्टिव्ह म्हणतो

Don’t worry about too many things at once, just concentrate on one thing, start small , think big

एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.

5) नेहमी शिकत राहा (Learn continually.)

मित्रांनो तुम्हाला वॉरेन बफे तर माहिती असतीलच, त्यांना शेर मार्केट मध्ये गुरूंचे गुरुं मानले जाते. ते दिवसात 600 ते 1000 पेज वाचन करतात. ते जवळपास त्यांचा 80% दिवसाचा वेळ हे वाचनात घालवतात. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा यादीत 2 किंवा 3 सातत्याने येतात. अश्या माणसाला देखील नाविन शिकण्याची आवश्यकता वाटते. तर तुम्हाला आणि मला आणखी किती शिकायचे आहे विचार करा.

यासाठी स्टिव्ह जॉब्स देखील म्हणतो

Learn continually. There’s always one more things to Learn.

निरंतर शिकत राहा. कितीही शिकले तरी आणखी एखादी गोष्ट शिकण्या साठी नक्की असते. जगातील सर्व यशस्वी लोकांना घ्या. ते त्यांचा वेळ हे नाविन काही तरी शिकण्यात ते जास्ती खर्च करत असतात.

6) फक्त पैशांसाठी नका करू(Don’t do it for money)

हा नियम माझा खूप आवडीचा नियम आहे. कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमावणे एवढंच उद्दिष्ट समोर ठेवून बनवण्यात अली असेल, ती गोष्ट फार काळ टिकू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय ठेवताना फक्त पैसे कमावणे एवढेच नका ठेवू. या गोष्टीला प्रमाण म्हणून तुम्ही कोणती ही मोठी कंपनी घ्या त्या कंपनी चे ध्येय हे पैसे कमावण्याचा वर आहे.

या साठी अप्पल कंपणीचेच ऊदाहरण घ्या. अप्पल मध्ये बनवले गेलेले सर्व प्रॉडक्ट्स नी जगात क्रांती आणली. जसे अप्पल कॉम्प्युटर पर्सनल कॉम्प्युटर विश्वात क्रांती आणली आणि i-phone आले आणि मोबाईल विश्वात क्रांती अली. इत्यादी.

या साठी स्टिव्ह जॉब्स म्हणतो.

Don’t do it for the money. Choose a job you love., And you will never have to work a day in your life.

म्हणजेच पैसा साठी काम नका करू. फक्त आवडीचे काम शोधा आणि तुम्हाला आयुष्यात कधी काम करायची गरज पडणार नाही. स्टिव्ह जॉब्स 25 वर्षाचा होता तेंव्हा त्याचा कडे 100 मिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती होती. पण त्याने कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमवण्या साठी केलं नव्हतं, त्याला आपल्या अविष्काराणी जग बदलायचं होत.

7) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका (Don’t let the noise of other’s opinion drown out your own inner voice.)

जगात सर्वात मोठी गोष्ट जी माणसाला यशा पासून दूर ठेवते ती म्हणजे लोक काय म्हणतील. आपण बऱ्याच वेळा एखादे काम, लोक काय म्हणतील हाच विचार करून करत नाही. लोक आपल्या प्रति काय विचार करतात हे तुम्हाला विचार करायची काहीच गरज नसते. लोकांचा या भाऊ गर्दीत तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज हरवू नका देऊ.

नेहमी मनातले करा, ज्यात तुमची आवड असेल ते करा. अगदी मन मोकळे बिंदास कोणाची तमा न बाळगता. आणि लोकांन साठी हे हिंदी गाणे म्हणा ‘कुछ तो लोग कहेंगे! लोगोका काम हे केहना’.

8) दुसऱ्याचं आयुष्य नका जगू (Don’t live someone else’s life)

प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकांचा चेहरा वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आवाज वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा आणि युनिक आहे. मग प्रत्येकला आपले स्वतंत्र विचार असू नये. म्हणून स्वतः विचार करा. थोडा वेळ स्वतः सोबत ही व्यतित करा. जाणून घ्या तुमच्या मधील स्टिव्ह जॉब्स ला.

स्टिव्ह म्हणतो.

Your time is limited so don’t west it leaving someone else’s life.

तुमचा वेळ हा खूप मर्यादित आहे, त्याला दुसऱ्याचा आयुष्या साठी नका खर्च करू. स्वतः साठी खर्च करा. तुमच्या जहाँजाचे तुम्हीच कॅप्टन बना. तुमच्या आयुष्याचं डिजाईन स्वतः तयार करा. तुम्हाला असे करण्या साठी दुसरी संधी अजिबात नाही मिळणार म्हणून एक तरी आता करा किंवा नंतर पश्चाताप करा. निवड तुमची आहे.

9) अनुकरण नका नेतृत्व करा ( innovation distinguishes between a leader and a follow.)

समाजात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे लीडर आणि दुसरे त्यांचे फॉलोअर्स(अनुयायी). लीडरने जे केलं किंवा जे करायला सांगितलं ते करतात ते अनुयायी आणि जे नवीन गोष्टी करतात ते लीडर. जर तुम्ही कोणाचे अनुकरण करत असाल तर तुम्ही देखील एक अनुयायी आहात. म्हणून स्टिव्ह म्हणतो लिडर आणि अनुयायी यात नाविन्य एवढंच फरक असतो. कामात नाविन्य आणले तर तुम्ही लीडर बाकी सर्व तुमचे फॉलोअर्स बनतील. मग आज पासून अनुकरण सोडून नाविन्य शोधायला लागा.

10) stay hungry, Stay foolish

स्टिव्ह जॉब्स यांचा खूप च गाजलेला हा विचार आहे.

Stay hungry stay foolish

‘स्टे हंग्री स्टे फुलीश’ म्हणजे. कधीच संतुष्ट नका होऊ खास करून शिकण्याचा बाबतीत. आणि पूर्ण पाणे मूर्ख बना, जे गोष्ट लोक अशक्य असे ठेवतात ती गोष्ट शक्य करण्याची धडपड करणारा मूर्ख बना. असे स्टिव्ह जॉब्स म्हणतो. म्हणून मित्रानो माझा एक शेवटचा सल्ला

STAY HUNGRY STAY FOOLISH

संदर्भ:- http://bit.ly/2rHZPA4

Saturday, April 22, 2017

Intro

MH🏡
🎂20Nov🎉
👨🎓eR estdT📚👼🎊
☺crazY 🎅🌐🎭fuNmasti🏄
🎭IT🎵🎤tayloRswifT🎶Stve🌟Gtes🎮
jmeS📟zucK💉torvaldS🎯🎊🏪lonG driveS 🚘

" म्हातारी "

" म्हातारी "

बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.
"ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही." म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.
"का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?"म्हातारी बोलली.
" तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ......कशाचं आहे ते गठुळं ?"
" वांगी हाईत."
"मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही."
"एवढं कुठं जास्त आहे ? ......तर नुसती एक बुट्टी तर आहे." म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.
" म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?" कंडक्टरनं विचारलं.
"मार्केट दे बाबा एक."
"लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल."
"ते काय असतंय ?"
"हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल."
"एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?...का उगाचच छळायचं गरीबाला ?"
"तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल."
"काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा."
इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .
"कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन."
कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली.
"आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ....का ट्रंकंला लगेज नसतंय ?" म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. "घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं." म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली.
ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ," ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे."असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.
तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली.
"आज्जी , वांगी कशी दिली ?" तिनं विचारलं.
" दहा रुपये पावशेर."
"पाच रुपयानं देणार ?"
"एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?"
"मग राहू दे." ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.
नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं.
"मावशे , वांगी कशी ?" एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं."
"वीस रूपये अर्धा किलो." म्हातारी बोलली.
"एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !"
"गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?"
"होय ! कालच आणली."
"किती रूपयला ?"
"पंचावन्न हजारला."
" मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?" तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.
म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.
तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.
अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.
"कशी काय पडली ?"
"उन्हाचा तडाखा बसला असेल."
"सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल."
"कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल."
सतरा जणांची सतरा तोंडं !
कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.
घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.
"म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?" कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.
"चल , मग काय तरी खाऊन घे...नाहीतर कोम्यात जाशील."
दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.
" आज्जी , वर बसा की !"वेटर बोलला.
"असूदे हितंच ."
"काय खाणार ?"
"काय हाय ?"
" बैंगन मसाला आणि रोटी देवू ?"
"ते काय असतंय ?"
"वांग्याची भाजी आणि रोटी !"
"चालंल." म्हातारी बोलली.
"तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची ." बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.
म्हातारीचं जेवण झालं.
"आज्जी , भात देऊ ?" वेटरनं विचारलं.
"नको.....पैसं किती झालं ?"
"एकशे ऐंशी रूपये."
"किती ?"
"एकशे ऐंशी रूपये.....साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी."
"एवढं पैसं एका जेवणाला ?"

      यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी.... दोनशे वीस रुपये झाले.

म्हातारी हिशेब लावत होती...

चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये....? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये....?
   मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..?

  विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली..... कोसळली ती कायमचीच.....!

माफ करा शेतिविषयक नाही....
पण चिंतन करायला लावणारी आहे.....
रहावल नाही म्हणुन पाठवलं ..... वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा...व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा...

Friday, March 31, 2017

‘महा आय. टी. जिनियस’ स्पर्धा 2017


 MKCLने दि. 2 एप्रिल 2017 ते 9 एप्रिल 2017 या कालावधीत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी. जिनियस’ ही ई – टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रु. 33 लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.
रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई – टेस्ट मधून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी http://genius.mkcl.org या संकेत स्थळावर लॉगइन करावे अथवा जवळच्या MS-CIT केंद्रात जाऊन कंप्युटरवर ही टेस्ट द्यावी असे आवाहन MKCL मार्फत करण्यात येत आहे.

Thursday, March 16, 2017

MS-CIT च का ?


जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या  ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकरसर  व डॉ. विवेक सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.
MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे .....

( महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE )
MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो.
MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही या अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे.

अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.
शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
MS-CIT अनिवार्य आहे. डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.

MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 7 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त *MS-CIT* मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे साॅफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था
MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS..... बॅटरी Backup ची सोय
MS-CIT ची परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या MSBTE या बोर्डाकडून घेतली जाते.
MS-CIT केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.
MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.
MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह)
MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोव्हिजनल सर्टिफिकेट  तसेच अल्पावधीतच फायनल सटीफिकेट
माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती. ICT केल्यानंतर पुढे काय तर ते म्हणजे  MS-CIT
या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संगणक संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा.....

 
- सचिन विजयकुमार कोतापुरे         
  (ALC Coordinator)
  कोतापुरे इन्फोटेक,मदनसुरी
  मो.नं -9850490173 , 9112000292
  ईमेल - 45210303@mkcl.org