Monday, November 6, 2017

बोधकथा (Adjust The Height-Attitude )

एका कार बनवणाऱ्या कंपनीतील एका इंजीनियरने एका वर्ल्ड क्लास लेवलच्या कारचे डिझायन तयार केले व कंपनीच्या मालकाला दाखविले.
मालक खुप प्रभावित झाला व त्याने त्या इंजीनियर ला कार तयार करण्यास सांगितले.
इंजीनियरने कार तयार केली. कार बघुन मालक खुश झाला.
आता ट्रायल घेण्यासाठी कारला कारखान्याच्या बाहेर नेण्याचे ठरले. पण त्यांच्या लक्षात आले कि कारची उंची ( Height ) कारखान्याच्या बाहेर निघण्याच्या कमानाकृती गेटपेक्षा २ इंचाने जास्त आहे.
इंजीनियर ला खुप वाईट वाटले. कारण कार तयार करताना त्याने ही गोष्ट लक्षात घेतली नव्हती.
आता, कार बाहेर कशी न्यावी,असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहीला.
कारखान्याचा पेंटर म्हणाला,कारला आपण बाहेर नेवु शकतो,फक्त वरच्या भागावर थोडे ओरखडे पडतील,ते आपण कारला बाहेर नेल्यानंतर पुन्हा पेंट करुन मिटवु शकतो.
इंजीनियर म्हणाला,त्यापेक्षा आपण हा गेट तोडुन टाकु. कार बाहेर नेल्यावर गेट पुन्हा बांधता येईल.
पण मालक कोणत्याही कल्पनेने आश्वस्त होत नव्हता. त्याला ओरखडे पडणे किंवा तोड-फोड हे शुभ शकुन नाही असे वाटत होते.
दुर उभा असलेला कारखान्याचा चौकीदार हे सर्व बघत होता. तो हळुच त्यांच्याजवळ आला व म्हणाला,मी काही सुचवु शकतो कां?
सर्वांना आश्चर्य वाटले,कि येथे इतक्या तज्ञ लोकांना उपाय सापडत नाहीय व हा सामान्य चौकीदार काय उपाय सुचवणार?
चौकीदार म्हणाला,
*"कार गेटपेक्षा फक्त २ इंच उंच आहे. साधी गोष्ट आहे,चारही टायर्स मधील हवा थोडी-थोडी कमी करा,कारची उंची कमी होईल व कारला बाहेर सहज नेता येईल .....!*

सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या!!!

*मित्रांनो,*
*प्रत्येकच समस्येचे समाधान तज्ञाच्या नजरेतुन विश्लेषण केल्यानेच मिळते असे नाही!*
    *कधी-कधी एखादा सामान्य व्यक्तीसुद्धा आपल्या समस्येचं निराकरण करु शकतो.*
    
    *जीवनातील समस्यांचं देखील काहीसं असंच असतं......*

*_Think Simple....._*
*_Do Simple......._*
*_Live Simple.....!!_*

*Because originally we are Happy Souls....!*

*Release Some Air ( Ego ).......*
                 and
*Adjust The Height ( Attitude ) ....... !*

No comments:

Post a Comment

Thanks