Saturday, November 18, 2017

काय आहे "महालाभार्थी" सेवा ?

 

माझ्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत अशी एकत्रितपणे माहिती मिळण्याचा आतापर्यंत कोणताही स्त्रोत नव्हता. त्यामुळे मी पात्र असतानाही फक्त माहिती नसल्यामुळे मला शासकीय सुविधांचा व योजनांचा फायदा घेता येत नाही असे माझ्यासह बहुतांश लोकांच्या बाबतीत होत असे. ही गरज असूनही ती कशी पूर्ण करता येईल याबाबत सर्वतोपरी विचार करून एमकेसीएलने हे पोर्टल तयार करून महाराष्ट्र शासनाला दिलेले आहे.

 

या पोर्टलवर अधिकाधिक लोकांनी रजिस्ट्रेशन करून त्यांच्या पात्रतेनुसार शासनाच्या कोणत्या योजना किंवा कोणते फायदे मिळविता येऊ शकतात यासंबंधी माहिती मिळविता येऊ शकते. समाजातील अशा हजारो लोकांना ही सुविधा वापरता यावी व आपण त्यांना मदत करावी असे अपेक्षित आहे. यासाठी स्थानिक वृत्तपत्रात माहिती देण्यासाठी ‘प्रेस नोट’ सोबत दिलेली आहे. तुम्ही त्यात योग्य ते बदल करून वृत्तपत्रात छापून आणावेत जेणेकरून अधिकाधिक लोकांना यासाठीचे फॉर्म्स तुमच्या केंद्रात भरले जातात अशी माहिती होईल.

 

ज्या ठिकाणी लोक एकत्रित होतात अशा ठिकाणी (बाजारपेठ, माहिती केंद्र, सुविधा केंद्र, वगैरे) पोस्टर्स लावावेत. या पोस्टरवर तुमच्या केंद्राचे डीटेल्स प्रिंट करून घेतल्यास अधिकाधिक लोक केंद्राला भेट देतील. या दोनही माध्यमातून केंद्रापर्यंत आलेल्या लोकांना ‘महालाभार्थी’ उपक्रमाविषयी आवश्यक असलेली माहिती https://www.mahalabharthi.in/mr/about-mahalabharthi या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करून लोकांशी संवाद साधल्यास केंद्रात येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल.

 

लोकांना उपयोगी असलेल्या व आपल्या केंद्रात अधिकाधिक लोकांना आणण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या या उपक्रमात तुम्हीही सक्रीय सहभाग नोंदवावा व या सर्व्हिसेससाठीची फी मिळविणे तसेच एमएस-सीआयटी कोर्स न केलेल्या लोकांना एमएस-सीआयटी कोर्स करण्यासाठी उद्युक्त करणे अपेक्षित आहे

No comments:

Post a Comment

Thanks